Chinchwad

थेरगाव सोशल फाऊंडेशनचा पहिला वर्धापन दिन साजरा

By PCB Author

July 15, 2019

चिंचवड, दि, १५ (पीसीबी) – थेरगाव सोशल फाऊंडेशन चा पहिला वर्धापन दिन थेरगाव येथे पार पडला. कार्यक्रमाची सुरवात TSF चा छोटा सैनिक कु. अथर्व धुमाळ यांच्या तबला वादनाने झाली.

मागील ६४ आठवडे TSF च्या माध्यमातून थेरगाव जी कामे करण्याणत आली होती, त्यावर चर्चा करण्यात आली. तसेच TSF च्या वेबसाईट चे उदघाटन झाले. फौंडेशन चे अनिकेत प्रभू यांनी वेबसाईट विषयी माहिती दिली, आता थेरगाव मधील नागरीक आपल्या समस्या helpline@thergaonsocialfoundation.com यावर नोंदवू  शकतात.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश पिंगळे तर आभार राहुल सरवदे आणि अनिल घोडेकर यांनी आभार मानले.