थेरगाव सोशल फाऊंडेशनचा दुसरा वर्धापनदिन उत्साहात साजरा

0
524

पिंपरी, दि.2 (पीसीबी): थेरगाव सोशल फाऊंडेशन चा दुसरा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कोविड-१९ कोरोनाच्या महामारीमुळे महाराष्ट्रावरच नाही तर पुर्ण जगावर आज जे संकट आले या विरुध्द ज्यांनी लढा दिला अशा कोरोना योध्दांचे थेरगाव सोशल फाऊंडेशन तर्फे सन्मान करण्यात आले. या लाॅकडाऊन मध्ये दुसर्यांदा मोठ्या संख्येने सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. पहिल्या भागात २८३ रक्त दात्यांनी रक्तदान केले तर दुसर्या भागात ९५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. लाॅकडाऊन मध्ये सर्वात मोठा फटका हा प्रिंट मिडीया म्हणजेच पत्रकार बंधुना बसला. त्यांना छोटी मदत म्हणुन १५० किट चे वाटप करण्यात आले. अशा अनेक गोष्टीनी थेरगाव सोशल फाऊंडेशन चा दुसरा वर्धापन दिन साजरा झाला.