थेरगाव येथे सोसायटीत पुरेशा सुविधा दिल्या नसल्याने ‘बिल्डर’वर गुन्हा दाखल

0
588

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – पाच वर्षापुर्वी गृहप्रकल्प ऊभा करून फ्लॅट धारकांना कम्प्लिशन सर्टिफिकेट, कँव्हीसिंग डिड आणि इतर सुख सुविधा न देणाऱ्या बिल्डर विरोधात मोफ्फा कायद्यानुसाऱ गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. थेरगाव परिसरात ही इमारात आहे.

या प्रकरणी चंद्रशेखर शिवाजीराव निंबाळकर (वय ३५, रा. सुर्यवेभव को – ऑपरेटिव्ह सोसायटी, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अलोक डेव्हलपर्सचे मालक सुनीलकुमार गांधी आणि त्यांच्या इतर भागीदाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधी आणि त्यांच्या भागीदारांनी थेरगाव येथे गृहप्रकल्प २०१३ मध्ये ऊभा केला होता. सुर्ववैभव को ­– ऑपरेटिव्ह सोसायटी असे नाव दिले आहे. मात्र, सोयायटी धारकांना कम्प्लिशन सर्टिफिकेट, कँव्हीसिंग डिड दिले नाही. तसेच उद्यान, फायर फायटिंग यंत्रणा, रेन हार्वेस्टिंग सिस्टीम, सर्व्हिस लिफ्ट व इतर सुविधा दिल्या नाहीत. यामुळे सोसायटीमधील नागरिकांनी तक्रार दिला असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाकड पोलिस तपास करत आहेत.