थेरगाव येथे बार असोसिएशन, रोटरी क्लबचे ‘जलपर्णीमुक्त पवनामाई अभियान’

0
1176

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी- चिंचवड बार असोसिएशन आणि रोटरी क्लब वाल्हेकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज (रविवार) सकाळी  थेरगाव, बोट क्लब केजुबाई बंधारा येथे जलपर्णीमुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई अभियान राबविण्यात आले.

यावेळी पिंपरी बार चे अध्यक्ष अॅड.सुनील कडूसकर,अॅड.अतिश लांडगे,अॅड.हर्षल नढे, अॅड.महेश टेमगिरे, अॅड.सुनील कड, अॅड.अंकुश गोयल, अॅड.प्रतीक जगताप, अॅड.श्रीधर धुमाळ, अॅड.अमोल खांडेकर, अॅड.विवेक गुप्ता, अॅड.स्मिता लांडे, दीपाली लांडगे यांनी पवना नदीतील जलपर्णी काढून पवना नदी प जलपर्णीमुक्त करण्यास मदत केली.

पिंपरी-चिंचवड बार असोसिएशन च्या वतीने पवना माई स्वछता अभियानासाठी रोटरी क्लबला  ५ हजार रोख रक्कम देण्यात आली.