थेरगाव येथे घरातून 72 हजारांचे दागिने लंपास

0
230

थेरगाव,दि.२५(पीसीबी) – एका घरातून अज्ञात चोरट्यांनी 72 हजार 150 रुपये किमतीचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता बापुजी बुवा नगर, थेरगाव येथे उघडकीस आली आहे.

दिलीप विष्णू तुरुकमारे (वय 47, रा. बापुजी बुवा मंदिर, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 सप्टेंबर रोजी रात्री साडेसात ते 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या उघड्या घरात प्रवेश केला. घरातील लॉक नसलेल्या कपाटातून 72 हजार 150 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत 24 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.