थेरगाव येथे कोयत्यासह तरुणाला अटक

0
588

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – कोयता बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १९) रात्री साडेअकराच्या थेरगाव येथे करण्यात आली.

अजय विजय सूर्यवंशी (वय २०, रा. थेरगाव) असे कोयत्यासह अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगावमधील तापकीर चौकातील हॉटेल मिटिंग पॉईंट शेजारी जय मल्हार पान शॉप आहे. त्या शॉपवर अजय लोखंडी कोयता घेऊन थांबला असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली होती. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून अजय याला अटक केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.