थेरगावात सव्वादोन लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

0
775

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – घरात प्रवेश करुन कपाटात ठेवलेले तब्बल २ लाख २५ हजार रुपये किमतीचे एकूण १२ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. हा प्रकार थेरगाव येथील मातोश्री हॉस्पिटल शेजारील घरात ६ ते १३ सप्टेंबर दरम्यान घडला.

याप्रकरणी पुष्पा नामदेव मोरे (वय ४५, रा. मातोश्री हॉस्पिटल शेजारील, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुष्पा मोरे या थेरगाव येथे राहतात. ६ ते १३ सप्टेंबर दरम्यान त्याचा राहत्या घराचा दरवाजा उघडा असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांची नजर चुकवून मोरे यांच्या घरातील कपाटात ठेवलेले तब्बल २ लाख २५ हजार रुपये किमतीचे एकूण १२ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले. हि बाब लक्षात येताच पुष्पा यांनी वाकड पोलिसात धाव घेतली. वाकड पोलिस चोरांचा शोध घेत आहेत.