Chinchwad

थेरगावात पतपेढीच्या पिग्मी एजंटांनी महिलेला घातला २२ लाखांचा गंडा

By PCB Author

August 01, 2018

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – पतपेढीमध्ये पैसे गुंतविल्या ज्यादा पैशांचा फायद होईल असे सांगून मुदत ठेव आणि डेली कलेक्शन व्दारे पैसे जमाकरुन घेऊन, महिलेच्या खोट्या सहया करुन त्यांच्या खात्यातील तब्बल २२ लाख ५९ हजार ६३८ रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक २००७ ते १० जानेवारी २०१८ दरम्यान करण्यात आली.

सुनंदा कानवडी (वय ४९, रा. संतोषनगर, चिंचवड) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी वाकड पोलिस ठाण्यात थेरगावातील शिवकृपा सहकारी पतपेढी लिमीटेड या शाखेतील तीन पिग्मी एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  थेरगावातील शिवकृपा सहकारी पतपेढी लिमीटेड या शाखेतील तीन पिग्मी एजंटांनी साल २००७ ते १० जानेवारी २०१८ दरम्यान सुनंदा कानवडी यांना पतपेढीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. यावर सुनंदा यांनी मुदत ठेव आणि डेली कलेक्शन व्दारे त्यांच्या पतपेढी खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांच्या खात्यामध्ये चांगले पैसे जमा झाले. हे कळताच शिवकृपा सहकारी पतपेढी लिमीटेड या शाखेतील तीन पिग्मी एजंटांनी सुनंदा यांची बनावट सही करुन त्यांच्या खात्यातील तब्बल २२ लाख ५९ हजार ६३८ रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केली. सुनंदा यांनी तीनही पिग्मी एजंटांवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. वाकड पोलिस तपास करत आहेत.