Chinchwad

थेरगावात दुचाकीवरुन चाललेल्या तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

By PCB Author

July 21, 2019

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – मित्राच्या आईला दुचाकीवरुन घेऊन चालेल्या एका तरुणावर चार जणांच्या टोळक्यांनी कोयता आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना धनगर बाबा मंदिराच्या मागे थेरगाव येथे घडली.

बाबासाहेब महादेव वडमारे (वय ३४, रा. ११५, १७/२स कैलासनगर, थेरगाव) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बहिण विशाखा महादेव वडमारे (वय २८, रा. ११५, १७/२स कैलासनगर, थेरगाव) यांनी शनिवारी (दि.२०) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चार हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.१५) रात्री साडेबाराच्या सुमारास जखमी बाबासाहेब हा त्याच्या मित्राची आई अनिता भाट यांना त्याच्या दुचाकीवरुन घरी घेऊन येत होता. यावेळी  धनगर बाबा मंदिराच्या मागे अज्ञात चौघा हल्लेखोरांनी बाबासाहेब यांची दुचाकी अडवली. तसेच कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने डोक्यात पायांवर आणि हातांवर जबर मारहाण करुन त्यांचा खुन करण्याचा प्रयत्न केला. सध्या बाबासाहेब यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्यांच्यावर कोणी आणि का हल्ला केला हे अद्याप समजू शकले नाही. वाकड पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.