थेरगावात तरुणीची गळफास घेत आत्महत्या

0
979

थेरगाव, दि. १३ (पीसीबी) – ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत एका तरुणीने राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. १२) सकाळी साडेदहाच्या सुमारास गुजरवस्ती, थेरगाव येथून उघडकीस आली.

यशोधा अनिल देवकर (वय १८, रा. गुजरवस्ती, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोधा हि थेरगावातील गुजरवस्तीत राहते. सोमवारी तीने राहत्या घरात कोणी नसताना लाकडी खांबाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. तीने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही. वाकड पोलीस तपास करत आहेत.