थेरगावात तरुणाच्या गळ्यातील सव्वालाखांची चैन चोरट्यांनी हिसकावली

0
474

वाकड, दि. १९ (पीसीबी) – पायी घरी निघालेल्या एका तरुणाच्या गळ्यातील १ लाख २५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी हिसकावली आणि फरार झाले. ही घटना बुधवार (दि.१७) रात्री सव्वादहाच्या सुमारास थेरगाव साईनाथनगर येथील विघ्नहर्ता कॉलनीत  घडली.

याप्रकरणी धोंडिबा हरीभाऊ बोराडे (वय ३४, रा. साईनाथनगर, विघ्नहर्ता कॉलनी, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, काळ्या-भगव्या रंगाच्या केटीएम दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार रात्री सव्वादहाच्या सुमारास फिर्यादी धोंडिबा हे पायी घरी निघाले होते. यावेळी तोंडाला रुमाल बांधून काळ्या-भगव्या रंगाच्या केटीएम दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी धोंडिबा यांच्या गळ्यातील ५० ग्रॅम वजनी १ लाख २५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावली आणि फरार झाले. पोलिस उपनिरीक्षक पी.एम.चौगुले चोरट्यांचा शोध घेत आहेत.