थेरगावातील महापालिकेच्या जलतरण तलावात बुडून अभियंत्याचा मृत्यू

0
795

थेरगाव, दि. १९ (पीसीबी) – महापालिकेच्या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका संगणक अभियंत्याचा चक्कर येऊन तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास थेरगावातील महापालिकेच्या खिंवसरा जलतरण तलावात घडली.

वैभव आचल जैन (वय २३) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव शनिवारी सायंकाळी थेरगाव येथील महापालिकेच्या खिंवसरा जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. तो पोहण्याची तयारी करून जलतरण तलावाच्या कडेला थांबला असता अचानक वैभवला चक्कर आली आणि तो पाच फूट खोल पाण्यात पडला. त्यापूर्वी त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. दुर्दैव म्हणजे त्याला पडताना कोणीही पाहिले नाही पडल्यानंतर दहा मिनिटांनी उपस्थित जीवरक्षकांनी पाण्यातून त्याला बाहेर काढले. आणि औंध येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू होता. वाकड पोलिस तपास करत आहेत.