Chinchwad

थेरगावमध्ये भावाला मारत असल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार

By PCB Author

January 27, 2019

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन एका तरुणाच्या भावाला तिघे तरुण मारहाण करत होते. हे पाहुण त्या तरुणाने मद्यस्ती करत, “माझ्या भावाला का मारताय”, असा जाब विचारला. यावर तिघा तरुणांनी त्याला लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण करत कोयत्याने वार केले. ही घटना शुक्रवार (दि.२५) सकाळी बाराच्या सुमारास घडली.

कुणाल संपत पवार (वय २०, रा. पवारनगर, सुर्यमुखी दत्तमंदीर चौक, थेरगाव) असे कोयत्याचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रवि भिलारे आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना पोलीसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी बाराच्या  सुमारास आरोपी रवि आणि त्याचे दोन साथीदार जखमी कुणाल याचा भाऊ कुंदन आणि त्याच्या मित्राला पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन जबर मारहाण करत होते. हे पाहुण कुणाल ने मद्यस्ती करत भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. तसेच, माझ्या भावाला का मारताय, असा जाब विचारला यावर तिघा आरोपींनी कुणाल याला लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण करुन त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यामध्ये कुणाल गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलीसांनी आरोपी रवि भिलारे आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सतीश माने तपास करत आहेत.