थेरगावमध्ये प्रत्येकी ४० हजारांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने दोन महिलांसह एका तरुणाची फसवणूक

0
592

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – प्रत्येकी ४० हजारांचे कर्ज मंजुर करुन देतो असे सांगून दोन महिलांसह एका तरुणाला प्रत्येकी चार हजार असे एकूण १२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ही घटना ८ मार्च ते २४ सप्टेंबर २०१८ दरम्यान घडली.

विद्या बन्सी राजगुरु (वय २७, रा. श्रीकृष्णकॉलनी, लेननंबर ३, रॉयलकोर्ट सोसायटीजवळ, थेरगाव), जयश्री कपील कापुरे (वय ३१, रा, लोंढे वस्ती, थेरगाव) आणि विशाल चंद्रवंशी (रा. भोसरी) असे फसवणूक झालेल्या तिघांची नावे आहे. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यानुसार निशीकांत दहीवडे (रा. १६ नंबर, थेरगाव) आणि त्याचा साथीदार रोहन मोरे (रा. कोथरुड, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मार्च ते २४ सप्टेंबर २०१८ या कालावधीत आरोपी निशीकांत आणि रोहन यांनी मिळून विद्या तिची बहिण जयश्री आणि विशाल या तिघांना प्रत्येकी ४० हजार रुपये कर्ज मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली प्रत्येकी चार हजार रुपये घेतले. मात्र बरेच दिवस उलटून देखील आरोपीनेक कर्ज मिळवून न देता प्रोसेसिंग फीचे चार हजार ही परत केले नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे समजताच विद्या तिची बहिण जयश्री आणि विशाल या तिघांनी वाकड पोलिसात आरोपी निशीकांत आणि रोहन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. वाकड पोलिस तपास करत आहेत.