Chinchwad

थेरगावमध्ये परिवर्तन सोशल फाऊंडेशन च्यावतीने जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी

By PCB Author

April 17, 2019

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले  आणि  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती थेरगावमधील  परिवर्तन सोशल फाऊंडेशनच्या वतीने अनावश्यक खर्च टाळून अनोखा  उपक्रम राबवून उत्साहात साजरी करण्यात आली. डीजे, डॉल्बी, मिरवणुक व फ्लेक्स बाजी  या वरील  अनावश्यक  खर्च टाळून  व कोणत्याही प्रकारची लोकवर्गणी न घेता सभासदांच्या  स्व: खर्चातून विधायक व  सामाजिक उपक्रम राबवून महापुरुषांची जयंती साजरी  करण्यात आली.

गणेशनगर येथील खिंवसरा पाटील विद्या मंदिर  शाळेतील विद्यार्थ्यांसाठी फुफ्फुसीय कार्य चाचणी व दंत चाचणी या मोफत आरोग्य तपासणीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. १३०  विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.  यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप देखील करण्यात आले. तसेच आरोग्य अधिकारी म्हणून दंतरोग तज्ञ डॉ. विनय शेट्टी, फुफ़्फ़ुस तज्ञ डॉ.लाटने, डॉ. विष्णू जाधव, बंटी त्यागी, यांनी काम पाहिले.  मुख्याधापक नटराज जगताप यांचेदेखील मोलाचे सहकार्य लाभले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान हे पुस्तक भेट देऊन मान्यवरांचा सत्कार  करण्यात आला. या शिबिराचे आयोजन परिवर्तन सोशल फाऊंडेशनचे दशरथ रणपिसे, मयुर कांबळे, रोहित ढोबळे, राहुल जाधव, राकेश गवळी, सचिन क्षीरसागर,  दत्ता एरंडे,  तुषार कांबळे,  अंतोष शिंदे,  राम गवळी, प्रकाश गायकवाड,  राहुल सरवदे,  गणेश रणपिसे या कार्यकर्त्यांनी केले.

या कार्यक्रमासाठी थेरगाव सोशल फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.