दांडिया खेळायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा थेरगावमध्ये विनयभंग; एकास अटक

0
1075

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – दांडिया खेळायला गेलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.१४) रात्री पावनेदहाच्या सुमारास थेरगाव कैलासनगर येथील आर.एस.ग्रुप नवरात्र मंडळाजवळ घडली.

याप्रकरणी पीडित १४ वर्षीय मुलीने वाकड पोलीसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आकाश बाबासाहेब गायकवाड (वय १९, रा. एकता कॉलनी हौसींग सोसायटी, नखातेनगर, साहेबराव कदम यांची खोली) आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पीडित १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी थेरगाव कैलासनगर येथील आर.एस.ग्रुप नवरात्र मंडळ येथे दांडिया खेळण्यासाठी गेली होती. रात्री पावनेदहाच्या सुमारास ती घरी जाण्यास निघाली असता आरोपी आकाश आणि त्याच्या साथीदाराने मुलीचा रस्ता आडवून तिचा हात धरला. तसेच तु खूप संदर दिसतेस मला तु हवी आहेस असे म्हणत शरीर सुखाची मागणी केली. यावर घाबरलेल्या पीडित मुलीने वाकड पोलीसात धाव घेतली. पोलीसांनी आरोपी आकाश याला अटक केली असून त्याचा अनोळखी मित्र अद्याप फरार आहे. वाकड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.