Notifications

थेरगावमध्ये तीन वर्षाच्या चिमुरडीचे लैंगिक शोषण करुन आरोपी फरार

By PCB Author

February 18, 2019

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – एका ४० वर्षीय इसमाने तीन वर्षाच्या चिमुरडीचे लैंगिक शोषण करुन फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.१७) सायंकाळी सहाच्या सुमारास थेरगावा येथील मानसी हॉटेलच्या पाठीमागच्या मोकळ्या जागेत घडली.