Chinchwad

थेरगावमध्ये तरुणांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य अपघाताचा धोका टळला

By PCB Author

October 29, 2018

थेरगाव, दि. २९ (पीसीबी) – थेरगाव, दत्तनगर बसस्टॉप समोर पीएमपीएमएल बसच्या गियर बाँक्स मधून आँईल गळती झाली. यामुळे रस्त्यावर आँईल पसरल्याने वाहने घसरुन अपघात होण्याचा धोका होता. याची माहिती थेरगाव सोशल फाउंडेशन तसेच बजरंग दलाच्या तरूणांनी अग्निशामक दलाला दिली.

त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी वहातुकीस अडथळा होत असलेली बस ढकलून बाजूला करत सांडलेल्या आँईल वर माती टाकून संभाव्य अपघाताचा धोका टाळला तर तरुणांनी अग्निशमन दलाला मदत करून आपली सामाजिक बांधिलकी दाखवली.