थेरगावमध्ये ट्रान्सफॉर्मरला आग; टेम्पोसह दुचाकी जळून खाक

0
482

थेरगाव, दि. २९ (पीसीबी) – थेरगावातील जय मल्हारनगर येथे असलेल्या शिवशंभो सोसायटीजवळील एका ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली. ही आग आज (शनिवार) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या आगीत ट्रान्सफॉर्मजवळ उभा असलेला छोटा हत्ती टेम्पो आणि एक एमएटी दुचाकी जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हाणी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेआठच्या सुमारास थेरगावातील जय मल्हानगर येथे असलेल्या शिवशंभो सोसायटीमधील एका विजेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली. यावेळी ट्रान्सफॉर्मरजवळ उभ्या असलेला छोटा हत्ती टेम्पो आणि एक एमएटी दुचाकी जळून खाक झाली. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या एका बंबाने आग आटोक्यात आणली. घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हाणी झाली नाही. मात्र काही काळ परिसरात भितीचे वातावरण होते.

दरम्यान, आग लागलेल्या ठिकाणी जाण्याचा रस्ता अरुंद असल्याने अग्निशमन दलाच्या बंबला घटनास्थळापर्यंत पोहचायला खूप वेळ लागला. तसेच कालच या ट्रान्सफॉर्ममरमध्ये स्पार्क होत असल्याने त्याचे काम केले होते असे स्थानिकांनी पीसीबीशी बोलताना सांगितले.