थेरगावमध्ये घरफोडी करुन चोरट्यांनी लांबवला पावनेदोन लाखांचा ऐवज

0
695

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – महिला मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या घराचे लॉक तोडून घरातील १ लाख ४० हजार रुपये किमतीचे ५५ ग्रॅम सोन्याचांदीचे दागिने आणि रोख ३० हजार रुपये असा एकूण १ लाख ७० हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही चोरी गुरुवारी (दि.२९ नोव्हेंबर) सायंकाळी ६ ते १ डिसेंबर दुपारी १ च्या दरम्यान थेरगावातील मोटादेवी मंदीराजवळील कैलासनगर येथील महिलेच्या घरात घडली.

याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या काळेवाडी येथील त्यांच्या मुलीच्या घरी तिला भेटण्यासाठी गुरुवारी (दि.२९ नोव्हेंबर) सायंकाळी ६ ते (दि.१ डिसेंबर) दुपारी १ च्या दरम्यान घराला कुलुप लावून गेल्या होत्या. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश करत घरातील कपाटातील आणि देवाऱ्यातील देवीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ७० हजारांचा ऐवज चोरुन नेला. वाकड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.