Chinchwad

थेरगावमध्ये कोयत्याचा धाक दाखवून दहशत पसरवणाऱ्या तरुणाला अटक

By PCB Author

December 05, 2018

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – कोयत्याचा धाक दाखवून परिसरात दहशत पसरवणाऱ्या एका तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.४) दुपारी दोनच्या सुमारास थेरगाव येथील पडवळनगर छत्रपती चौकात करण्यात आली.

मिलन संजय वोदक (वय २४, रा. पडवळनगर, थेरगाव) असे कोयत्यासह अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरोधात घातक हत्यार बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास थेरगाव पडवळनगर येथील छत्रपती चौकात एक तरुण कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवत आहे, अशी माहिती वाकड पोलिसांना मिळाली. यावर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन मिलन वोदक या तरुणाला धारदार कोयत्यासह अटक केली. त्याच्याविरोधात घातक हत्यार बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.