Chinchwad

थेरगावमधे ढोलताशांच्या गजरात निघालेल्या देवीच्या मिरवणुकीने नवरात्रौत्सवाची सांगता

By PCB Author

October 19, 2018

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – थेरगाव, दत्तनगर येथील एकता मित्र मंडळाच्या वतीने ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत देवीची मिरवणूक काढून नवरात्रौत्सवाची सांगता केली.

एकता मित्र मंडळामार्फत साजरा केला जाणारा नवरात्रौत्सव म्हणजे थेरगावचे प्रमुख आकर्षण असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाने नवरात्रौत्सव उत्साहात साजरा केला. नऊ दिवस  पारंपारिक पद्धतीने देवीचा  जागर आणि पूजा करण्यात आली. महाप्रसादाने उत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी थेरगाव आणि परिसरातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दसऱ्याच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतिषबाजी करत देवीची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.