Chinchwad

थेरगावमधील स्कायफिट जिममध्ये ट्रेनर ठेवल्याच्या रागातून टोळक्यांकडून एकाला मारहाण

By PCB Author

April 02, 2019

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – थेरगावमधील स्कायफिट जिममध्ये ट्रेनर ठेवल्याच्या रागातून सहा जणांच्या टोळक्यांनी एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. ही घटना थेरगाव येथील स्कायफिट जिमच्या पार्किंमध्ये घडली.

आदित्य नामदेव बांगर (वय १८, रा. घर नं.१०७३, वैभव कॉलनी, विजयनगर, काळेवाडी) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोहन गाडे, बबलु गाडे आणि त्यांच्या अज्ञात चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.३०) आरोपी रोहन गाडे, बबलु गाडे आणि त्यांच्या अज्ञात चार साथीदारांनी फिर्यादी आदित्य याने त्याच्या थेरगावमधील स्कायफिट जिममध्ये ट्रेनर ठेवल्याच्या रागातून, त्याला जिमच्या पार्किंमध्ये गाटून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली आणि पसार झाले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भोगम तपास करत आहेत.