Chinchwad

थेरगांव सोशल फाऊंडेशनच्या तत्परतेमुळे ऑईल सांडलेला रस्ता झाला स्वच्छ

By PCB Author

February 27, 2019

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – थेरगावातील बारणे चाळ ते रोसवुड हॉटेल या रस्त्यावर १ किलोमीटर अंतरावर ऑईल सांडून रस्ता निसरडा झाला होता. त्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडून जखमी झाले. ही घटना आज (बुधवार) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत सुहास शिगवण आणि रुपेश पाटसकर यांनी थेरगांव सोशल फाऊंडेशनला माहिती दिली. त्यानंतर तातडीने फाऊंडेशनच्या सदस्यानी घटनास्थळी धाव घेतली. या मार्गावरील वाहतूक दुसरीकडून वळवण्यात आली. तसेच अग्निशमन दलाला बोलवून रस्ता साफ करून घेतला.

यावेळी राहुल सरवदे,अंकुश कुदळे, प्रशांत चव्हाण, अशोक धुमाळ, सचिन झरेकर, शेखर गांगर्डे यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच स्थानिक नागरिक व पोलीस कर्मचाऱ्यांनीही मदत केली. तसेच थेरगांव सोशल फाऊंडेशनच्या वतीने वाहतूक पोलीस व अग्निशामक दलातील जवानांना श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.