थायलंडच्या कॉल गर्लचं झालं कोरोनाने निधन; पण त्यामुळे लखनौ मध्ये…

0
307

लखनौ,दि.१४(पीसीबी) – संपूर्ण जग कोरोना साथीच्या आजाराचा सामना करत असून, मृतांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. त्यातच उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील एका मोठ्या व्यावसायिकाच्या मुलाने थायलंडमधील कॉल गर्लवर 7 लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानं खळबळ उडालीय. कॉल गर्ल लखनऊला 10 दिवसांपूर्वी आली होती. लखनऊमध्ये आल्यानंतर 2 दिवसांनी तिला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यातच ती कोरोनाच्या संसर्गानं आजारी पडली. त्या बड्या व्यावसायिकाच्या मुलानं थायलंड दूतावासाला याची माहिती दिली. दूतावासाच्या हस्तक्षेपानंतर कॉल गर्लला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे तिचा 3 मे रोजी मृत्यू झाला.

कॉल गर्लच्या निधनानंतर राजधानीतील विभूतिखंड पोलीस हस्तांतरण आणि अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेत अडकलेत. थायलंड दूतावासामध्ये पोलिसांनी संपर्क साधून तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण यश मिळू शकले नाही. त्यानंतर पोलिसांनी गाईड सलमानच्या उपस्थितीत राजधानीत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. कॉल गर्ल गाईड सलमानच्या मदतीने भारतात आली होती.

कॉल गर्लच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने शोध सुरू केलाय. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजधानीत आंतरराष्ट्रीय रेक्स रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता आहे. थायलंडहून भारतात आल्यानंतर पोलिसांनी कॉल गर्लच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोधही सुरू केलाय. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉल गर्ल राजस्थानच्या एका ट्रॅव्हल एजंटच्या संपर्कात होती, ज्याच्या माध्यमातून तिला लखनऊला पाठविण्यात आले. आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

जेव्हा 7 लाख देऊन बोलावलेली कॉल गर्ल 2 दिवसांनी आजारी पडली, तेव्हा त्या बड्या व्यावसायिकाच्या मुलानं थेट थायलंड दूतावासाशी संपर्क साधला. थायलंड दूतावासाने तातडीने हे प्रकरण भारत सरकारला कळवले, त्यानंतर त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. 3 मे रोजी कॉल गर्लचा मृत्यू झाला, तेव्हा ही बाब उघडकीस आली आणि लखनऊ पोलीस कारवाईत आले. यावेळी पोलिसांना समजले की व्यावसायिकाच्या मुलानं कॉल गर्लला 7 लाख रुपये देऊन लखनौला बोलावले.