Desh

थरारक: एक्स गर्लफ्रेंसोबत भांडण झाल्याने तरुणाने घेतला लाईव्ह गळफास

By PCB Author

June 18, 2019

राजस्थान, दि. १८ (पीसीबी) – एक्स गर्लफ्रेंसोबत भांडण झाल्याच्या कारणावरुन एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.१७) राजस्थानच्या अलवरमध्ये घडली.

निर्मल कुमावत (वय २०, रा.बेहरोर) असे मृत तरुणाचे नाव आहे. फेसबुक लाईव्ह करुन निर्मलने आधी प्रेमात झालेल्या फसवणुकीची माहिती दिली त्यानंतर त्याने गोळया खालल्या आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. लोकांनी या आत्महत्येचे लाईव्ह स्ट्रीमिंगही पाहिले असे पोलिसांनी सांगितले. निर्मलने दोन तास आत्महत्येचा लाईव्ह स्ट्रीमिंग केले. प्रेमात झालेल्या फसवणुकीबद्दल तो खूप वेळ बोलला. त्यानंतर आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने सांगितले. निर्मल इतके टोकाचे पाऊल उचलत असताना कोणी त्याला थांबवले नाही. उलट लोकांनी कमेंट बॉक्स दु:ख होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. बेहरोर पोलिसांना याबद्दल माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले व निर्मलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. बेहरोर पोलीस तपास करत आहेत.