थरारक: आईविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याने मित्रानेच कापले मित्राचे शीर

0
471

बंगळुरू, दि. ३० (पीसीबी)  –  आईविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याने कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यात एका २८ वर्षीय तरणाने आपल्या मित्राचेच शीर कुऱ्हाडीने कापून ते घेऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना शनिवारी (दि.२९) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

पशुपती असे आरोपीचे नाव असून तो मृत गिरीशचा चांगला मित्र होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीशने आपल्या आईविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली, त्याचा राग आल्याने आपण त्याचे शीर कुऱ्हाडीने कापून हत्या केल्याची कबुली आरोपी पशुपतीने पोलिसांकडे दिली आहे. हे दोघेही मंड्या जिल्ह्यातील चिक्काबगीलू गावात रहात होते. पोलिसांनी सांगितले, की शनिवारी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी पशुपती पोलीस ठाण्यात आला. तेव्हा तो रक्ताने माखलेल्या कपड्यात होता. तसेच त्याच्या हातामध्ये गिरीशचे शीर होते. आपला गुन्हा कबुल करत त्याने आत्मसमर्पन केले. हत्येमध्ये वापरण्यात आलेली कुऱ्हाडही पोलिसांनी जप्त केली आहे.