थरमॅक्स लि. व्यवस्थापन व थरमॅक्स कामगार संघटनेचा वेतन करार संपन्न

0
1154

चिंचवड,दि.१६(पीसीबी) – थरमॅक्स लि. व्यवस्थापन व थरमॅक्स कामगार संघटना यांच्यामध्ये १२५०० रुपयांचा वेतन करार संपन्न झाला, सदर कराराचा लाभ चिंचवड फॅक्टरी मधील सर्व कामगारांना होणार असून करारामुळे कामगारांचे किमान ९८२५ रुपये व कमाल वेतनवाढ २०५६० रुपये एवढी वाढ झाली आहे.

या कराराचा कालावधी १ मे २०१९ ते ३० एप्रिल २०२२ असा तीन वर्षाचा राहील. तसेच सेवाजेष्ठता पारितोषिकात ६५०० रुपये वाढ करून १५००० रुपये करण्यात आली.

उच्चशिक्षणासाठी कामगार पाल्यास २००००० रुपये (दोन लाख) शैक्षणिक कर्ज चालू करण्यात आला आहे त्याचबरोबर दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक ५०० रुपये मध्ये वाढ करून १०० व १०० रुपयांमध्ये वाढ करून २००० करण्यात आली आहे.तसेच सणावाराच्या उचल मध्येही ४००० रुपयांची वाढ करून १४००० रुपये करण्यात आली आहे.

थरमॅक्स कंपनी ही जगातील बॉयलर क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असून चिंचवड येथे कंपनीची मूळ स्थापना 1966 साली झाली. सदर वेतन करार हा औद्योगिक मंदीच्या काळामध्ये वेतन करार असून पुणे औद्योगिक क्षेत्रातील उत्कृष्ट वेतन करार आहे.

या करारामध्ये युनियनच्या वतीने अध्यक्ष श्री किशोर सोमवंशी, जनरल सेक्रेटरी श्री संजय देशमुख, कार्याध्यक्ष श्री महेंद्र पासलकर, उपाध्यक्ष सुशील मिरगल, सेक्रेटरी विश्वास पोळ, सेक्रेटरी मिलिंद वायस्कर, खजिनदार एकनाथ उगले, सदस्य भीमराव धस, सदस्य राजेंद्र पाटील, सदस्य प्रदीप तरटे तसेच व्यवस्थापनाच्या वतीने इ .आर .हेड सुहास गर्दे, फॅक्टरी मॅनेजर रॉकी अल्वारिस,मॅन्युफॅक्चर डिव्हिजन हेड किरण शाळीग्राम, प्रोडक्शन हेड जुडा कॉइंन, असिस्टंट मॅनेजर राहुल चौगुले,ॲडव्हायझर प्रवीण खेसे आदींनी स्वाक्षरी केल्या.

या करारात ऑप्शन पॉझिटिव्ह चे संचालक मा. श्री. रवींद्र श्रोत्री साहेब,एच.आर.विभागाचे मा.श्री.शरद गांगल साहेब व मा. श्री.हेमंत मोहगावकर साहेब यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.