थंडीच्या दिवसात आपल्या आहारात शेवग्याच्या शेंगा का असाव्यात… याचे ‘हे’ फायदेशीर कारण नक्की जाणून घ्याचं

0
383

दिसायला लांबसडक कोवळी हिरवीगार शेवग्याची शेंग चवीला देखील भारी असते. शेवग्याची शेंगेची भाजी हि थंडीच्या दिवसांमध्ये खासकरुन अनेक जणांच्या घरी केली जाते. लांब काठीसारख्या दिसणाऱ्या या हिरव्यागार शेंगा अनेकदा सांबारमध्ये दिसून येतात. परंतु, अनेक मराठी कुटुंबांमध्ये शेंगांची किंवा त्याच्या पानांची सुद्धा भाजी करतात. तसंच आमटीमध्येदेखील शेंगा वापरल्या जातात. या शेंगामध्ये मोठ्या प्रमाणावर मिनरल्स आणि प्रोटीन्स असतात. त्यामुळे आहारात शेवग्याच्या शेंगाचा वापर हमखास करायला हवा. कारण या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. पण याचे फायदे काही लोकांना माहित नसल्याने लोक या शेंगा खाण्याचं टाळतात.

 मग आज जाणून घेऊयात या लांबसडक शेवग्याच्या शेंगेची वैशिष्ट्य-
१. शरीरातील रक्ताची कमतरता शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे दूर होते. शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह          असतं त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.

२. शेवग्याचा पाला हा आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला असतो. याशिवाय या पाल्याची भाजी केली        जाते.

३. या शेंगांमध्ये कॅल्शिअमचं प्रमाण पुरेपूर असल्यामुळे हाडे मजबूत होतात.

४. पचनक्रिया सुधारते त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

५. थकवा दूर होतो