‘त्या’ विधानाप्रकरणी रामदास आठवलेंनी मागितली माफी

0
735

नवी दिल्ली, १६ (पीसीबी) – पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे मला काही फरक पडत नाही, कारण मी एक मंत्री आहे. मला मोफत पेट्रोल-डिझेल मिळते, असे विधान  केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले होते. या विधानानंतर आठवले यांच्यावर   देशभरातून टीका होऊ लागल्यानंतर अखेर त्यांनी आज (रविवार) माफी मागितली आहे. माझ्या विधानामुळे जरा लोकांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागतो असे त्यांनी म्हटले आहे.

मी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीने त्रस्त नाही, कारण मी मंत्री आहे. माझे मंत्रिपद गेले तर मला याचा त्रास होईल. पण जनता सध्याला त्रस्त आहे. हे समजू शकतो आणि किमती कमी करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे आठवले म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा सोशल मीडियावर चांगलाच खरपूस समाचार घेण्यात आला.

यानंतर आठवले म्हणाले की, जर यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागू इच्छितो. माझा हा हेतू नव्हता. मी एक सामान्य माणूस आहे, जो मंत्री झाला आहे. मी सामान्य लोकांचा त्रास जाणतो. मी सरकारचा हिस्सा असून, मीही किंमती कमी करण्याची मागणी करत आहे.