‘त्या’ मंत्र्यांना मंत्रालयात जाऊन दारु पाजणार’ तृप्ती देसाईंचा इशारा

0
381

मुंबई, दि.१८ (पीसीबी) – महाविकास आघाडी सरकार चंद्रपूरमधील दारुबंदी हटवण्याच्या तयारीत आहे. गेल्या पाच वर्षात शेकडो कोटींचा महसूल बुडाल्याने सरकार दारुबंदी हटवण्याच्या विचारात आहे. मात्र, तृप्ती देसाई यांनी या दारुबंदी उठवण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे .“चंद्रपूरची दारुबंदी हटविण्यासाठी जे मंत्री पुढाकार घेतील त्यांना भूमाता ब्रिगेडच्या महिला मंत्रालयात जाऊन दारु पाजतील”,असा इशारा भूमाता ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी राज्य सरकारला दिला आहे.

“महसूलसाठी अनेक चांगले पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. चंद्रपूरची दारुबंदी हटवू नये, महिलांचा शाप असलेला पैसा महसूल म्हणून स्वीकारू नये”, असे तृप्ती देसाई म्हणाल्या. “मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी बिहार आणि गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात दारूबंदी करावी”, अशी विनंती तृप्ती देसाई यांनी केली आहे.