‘त्या’ निवडणुकांमधील प्रचार मोहिमांसाठी भाजपने खर्च केले 252 कोटी रूपये

0
375

नवी दिल्ली, दि.१२ (पीसीबी) : चालू वर्षाच्या प्रारंभी पाच विधानसभांच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमधील प्रचार मोहिमांसाठी भाजपने 252 कोटी रूपये खर्च केले. त्यामध्ये पश्‍चिम बंगालसाठीचा वाटा 60 टक्के इतका ठरला. काही महिन्यांपूर्वी बंगालबरोबरच आसाम, तामीळनाडू आणि केरळ या राज्यांत निवडणुका झाल्या. त्याशिवाय, पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेशही विधानसभा निवडणुकीला सामोरा गेला. त्या निवडणुकांमधील खर्चाचा तपशील भाजपकडून सादर करण्यात आला. तो निवडणूक आयोगाने सार्वजनिक केला.

त्यानुसार, भाजपने आसाममध्ये जवळपास 44 कोटी रूपये, केरळमध्ये 29 कोटी रूपये, तर तामीळनाडूत 23 कोटी रूपये खर्च केले. पुदुच्चेरीतील प्रचारासाठी भाजपला अवघे 4.79 कोटी रूपये पुरेसे ठरले. बंगालमध्ये भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली होती. त्या राज्यातील प्रचार मोहिमेसाठी भाजपने 151 कोटी रूपये मोजले. बंगालची सत्ता राखणारा तृणमूल कॉंग्रेस पक्ष खर्चातही भाजपच्या वरचढ ठरला. तृणमूलने प्रचार मोहिमेसाठी 154 कोटी रूपये खर्चले.