‘त्या’ नराधमांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही – धनंजय मुंडे

0
837

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – आमच्या भगिनींवर अत्याचार करणार्‍या  नराधमांवर  कठोर कारवाई  जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हा भाऊ स्वस्थ बसणार नाही, अशा ग्वाही  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज (शुक्रवारी ) येथे दिली. हिंजवडी येथील पीडीत मुलींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनी कुटुंबीयांना  आधार दिला.

हिंजवडी परिसरात राहणार्‍या एका बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगाराच्या मुलींवर चौघा नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेचे राज्यात  तीव्र पडसाद उमटले आहेत.  मुंडे यांनी पीडीत मुलींच्या कुटुंबियांची भेट घेतली. आणि मी तुमच्याबरोबर आहे, असा आधार दिला.

यावेळी बोलताना आगामी अधिवेशनातही कायदा व सुव्यवस्थेचा तसेच ऊसतोड कामगारांचे प्रश्न, अडचणी, त्यांच्या समस्या या मुद्द्यावर  सरकारला जाब विचारणार  असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बीडच्या  भाजप खासदार  प्रीतम मुंडे यांनी दोन दिवसापूर्वी पीडित मुलींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला होता.