त्या आयुक्तांनाच कोरोनाची लागण, प्रशासनाच्या चिंता वाढल्या

0
342

प्रतिनिधी दि ३० जून(पीसीबी) : सोलापूरचे आयुक्त पी. शिवशंकर हे कोरोना बाधित झाले आहेत. आयुक्तांचाच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे तसेच जिल्हाधिकारी आणि इतर महत्वाच्या नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत २७ जून रोजी झालेल्या बैठकीत सोलापूरचे आयुक्त शिवशंकर देखील उपस्थित होते.

या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. लाॅकडाऊन १ संपताच सोलापुरात कोरोनाचा पहिला रुग्ण आणि पहिला बळी सापडला होता. परंतु त्यानंतर सोलापुरातील परिस्थिती आता नियंत्रणात आणताना प्रशासनाची चांगलीच कसरत करावी लागत आहे. जिल्ह्याचा ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या आधी सोलापुच्या महापौरांना देखील कोरोनाची लागण झाली होती.

सोलापूर शहरात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्यावर आहे. पण आता त्यांनाच कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासनाचं आव्हान आणखी वाढणार आहे.