…त्यामुळे रोहित पवारांनी प्रचार नाही केला तरी चालतंय – सुप्रिया सुळे

0
687

कर्जत, दि. १८ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीत भाजपचे ६ मंत्री अडचणीत  आहेत, असा भाजपचा सर्व्हे सांगत आहे, या ६ मंत्र्यांमध्ये  एक नाव राम शिंदे यांचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी निश्चिंत राहावे, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी त्यांची कर्जतमध्ये सभा झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.  यावेळी अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार, रुपाली चाकणकर, सक्षणा सलगर यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सहा मंत्री अडचणीत असल्यामुळे भाजप प्रचंड चिंतेत आहे. आपले पोरगं पास होणार का नापास? हे आईलाच माहिती असते. आता भाजपच म्हणत आहे की, माझं पोरगं नापास होणार आहे. त्यामुळे रोहित पवारने आरामात बसले पाहिजे. २-४ दिवस प्रचार केला नाही, तरी चालतंय. तुम्ही निवडून येतातच आहात. हे मी नाही भाजप म्हणतेय’, असे त्यांनी म्हटले आहे.