…त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते

0
606
नगर, दि.२१ (पीसीबी) – आज पर्यंत अनेक मंदिर गाभारा प्रवेश, हाजी अली दर्गा प्रवेश आंदोलने केली. परंतु कधीच कोणाला, कोणाच्या धार्मिक भावनांना मी दुखावले नाही. इंदुरीकर यांना वारंवार महिलांचा अपमान केल्याप्रकरणी आम्ही विरोध करीत आहोत. यात कोठेही वारकरी संप्रदाय किंवा हिंदू धर्म याबद्दल मी काहीच चुकीचे बोलले नाही वारंवार संप्रदाय आणि हिंदू धर्माचा मी आदरच करते,’ असे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई म्हणाल्या.
त्यांनी याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे. यामध्ये त्या म्हणतात, परंतु मी धार्मिक भावना दुखावल्या असे अनेक खोटे आरोप माझ्यावर होत असून मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, महिलांच्या अपमानाच्या वक्तव्याला विरोध याला धार्मिक रंग लावणे पूर्णपणे चुकीचे आहे,’ असे मत त्यांनी या पोस्टमध्ये मांडले आहे.

 

काय लिहले आहे फेसबुक पोस्टमध्ये पहा

आज पर्यंत अनेक मंदिर गाभारा प्रवेश, हाजी अली दर्गा प्रवेश आंदोलने केली. परंतु कधीच कोणाला, कोणाच्या धार्मिक भावनांना मी दुखावले नाही….

इंदुरीकर यांना वारंवार महिलांचा अपमान केल्याप्रकरणी आम्ही विरोध करीत आहोत.

यात कोठेही वारकरी संप्रदाय किंवा हिंदू धर्म याबद्दल मी काहीच चुकीचे बोलले नाही वारंवार संप्रदाय आणि हिंदू धर्माचा मी आदरच करते असे सांगितले आहे.

परंतु मी धार्मिक भावना दुखावल्या असे अनेक खोटे आरोप माझ्यावर होत असून मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, महिलांच्या अपमानाच्या वक्तव्याला विरोध याला धार्मिक रंग लावणे पूर्णपणे चुकीचे आहे.

त्यामुळे असे खोटे आरोप माझ्यावर कोणीही करू नयेत. मी कधीही कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या नाहीत आणि दुखावणार नाही, आणि #जर #कोणाला #वाटत #असेल #की #धार्मिक #भावना #दुखावल्या #गेल्या #आहेत ,#मी #तर #दुखावल्या #नाहीत #तरीही #असे #काही #जणांना #जर #वाटत #असेल #तर #मी #जाहीर #माफी #सोशल #मीडियाच्या #माध्यमातून #मोठ्या #मनाने #मागत #आहे- तृप्ती देसाई, अध्यक्ष भूमाता ब्रिगेड.

परंतु महिलांचा अपमान केल्याप्रकरणी तसेच पीसीपीएनडीटी ॲक्टनुसार इंदुरीकरांवर कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे ‌.ही आमची मागणी कायम आहे आणि राहील….

Gepostet von Trupti Desai am Donnerstag, 20. Februar 2020