Maharashtra

…त्यामुळे पंकजा मुंडे भाजप सोडून जातील असं मला वाटत नाही – विनायक मेटे

By PCB Author

October 24, 2020

औरंगाबाद,दि.२४(पीसीबी) – ‘पंकजा मुंडे या त्यांच्या प्रदेश अध्यक्षांना कितीही वाईट बोलल्या. धिक्कार केला, काहीही बोलल्या, त्यांच्या कार्यक्रमाला नाही गेल्या. वाईट कमेंट केल्या, तरी हे सगळं फक्त भाजप सहन करतो. त्यामुळे पंकजा मुंडे भाजप सोडून जातील असं मला वाटत नाही.’ असं विधान शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केलं आहे.

मराठा आरक्षण प्रकरणी आघाडी सरकारने समाजाला सैरभैर केलं आहे. बैठकीत सरळ-सरळ चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण प्रकरणी काही घडलं तर त्याला फक्त अशोक चव्हाण जबाबदार असतील. अशोक चव्हाण हे फक्त खुर्ची उबवण्याचं काम करत आहेत, अशी गंभीर टीकाही यावेळी मेटेंनी केली.

दरम्यान खरंतर खडसेंप्रमाणे, पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या पाहिजेत. म्हणजे राजकारणात मजा येईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती.