“….त्यामुळे उद्धव ठाकरे माझ्यावर रागावले”- संजय राऊत

0
561

मुंबई, दि.१३ (पीसीबी)- शिवसेना नेते संजय राऊत यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सत्तास्थापनेसाठी राज्यात नाट्यमय घडामोडी घडत असताना शिवसेनेची खिंड लढवणारे खासदार संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने सोमवारी दुपारी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

डिस्चार्ज मिळाल्यानतंर बोलताना, तब्बेतीची काळजी न घेतल्याने उद्धव ठाकरे आपल्यावर रागावले होते असा खुलासा केला. तब्बेतीची काळजी घेण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

संजय राऊत यांनी यावेळी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असा विश्वास व्यक्त केला. “अडीच- अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पुढच्या गोष्टी असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल,” असं संजय राऊत यांनी असे म्हटले आहे.