त्याने चोरी केली खरी पण त्याला माहित नव्हती हि गोष्ट…

0
216

तळेगाव दाभाडे, दि.19 (पीसीबी) : दिवसाढवळ्या किराणा व्यापाऱ्यांच्या दुकानातून माल लंपास करणाऱ्या एका चोरट्याला सीसी टीव्ही फुटेजच्या आधारे तळेगाव पोलिसांनी जेरबंद केले. आदेश दिलीप लुंकड (वय ३३, रा. मोहननगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. बुधवारी  (दि .१६) सकाळी साडेअकराच्या सुमारास तळेगाव स्टेशन भागातील श्री.स्वामी समर्थ प्रोविजन स्टोअर या किराणा मालाच्या दुकानातून एका चोरट्याने ४ हजार ६०० रुपये किमतीचे १५ लिटरचे सोयाबीन तेलाचे तीन बॉक्स प्रत्येकी किंमत २ हजार १०० रुपये असा एकूण १० हजार ९०० रुपयांचा माल चोरून नेला.

या संदर्भात दुकानाचे मालक, तळेगाव स्टेशन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय मुनोत (वय ५६, रा. तळेगाव स्टेशन) यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मुनोत यांनी पोलिसांना चोरी संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची सुत्रे वेगाने हलवली. सीसीटिव्ही फुटेज गुन्ह्यात वापरलेल्या मोपेड गाडीचा मिळालेला नंबर आणि खबऱ्याकडून मिळालेली माहिती यामुळे पोलिसांनी आदेश लुंकड याच्या मुसक्या वेळीच आवळल्या. शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी लुंकड याला अटक करण्यात आली अटकेमुळे काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आदेश लुंकड याला शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे

पानटपरीमध्ये विक्रीसाठी गांजा ठेवल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी दुपारी जाधववाडी, चिखली येथे ही कारवाई केली आहे. हनुमान भागोजी उबाळे (वय ४८, रा. जाधववाडी, चिखली ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलीस शिपाई अजित कुटे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.