Maharashtra

त्याच्या आईने आंबा खाल्ला नसता, तर संभाजी भिडे तयारच झाला नसता – नितेश राणे

By PCB Author

October 13, 2018

सोलापूर, दि. १३ (पीसीबी) – वादग्रस्त संभाजी भिडे कसा जन्माला आला. त्याच्या आईने  आंबा खाल्ला नसता, तर हा  भडवा तयारच झाला नसता, अशा शब्दात  आमदार नितेश राणे  यांनी त्यांच्यावर तोफ डागली. राम गणेश गडकरी यांचा फक्त पुतळा काढला  होता. मात्र, भिडे कमी वयाचा असता तर…. ,अशा भाषेत नितेश यांनी भिडे गुरुजींना  थेट धमकीच दिली.

बार्शीत मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राणे यांनी संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांचा कार्यक्रम करा, असे जाहीरपणे सांगितले. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल कुणीही काहीही लिहिले. तर खपवून घेऊ नका. जे बदनामीकारक लिखाण करतात त्यांच्या पुस्तका बरोबर लेखकाला फाडा ,त्यांचा कार्यक्रम करा आणि मग फोन करा, पोलीस ठाण्यामधून सोडवण्यासाठी, असे ते म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मी राजीनामा देणार नाही. मैदान सोडून पळण्यापेक्षा मैदानात राहून लढेन.कारण सभागृहात मराठा लोकप्रतिनिधी म्हणून आरक्षणाचा प्रश्न मांडणे माझे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले.