त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर … गाठ शिवसेनेशी आहे -खा.धैर्यशील माने

0
553

हातकणंगले,दि.२७(पीसीबी) – महाराष्ट्र एकीकरण समितीतील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लावला तर गाठ शिवसेनेशी आहे, असा इशारा शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी दिला आहे. गुरूवारी कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांच्या वक्तव्याचा धैर्यशील माने यांनी समाचार घेतला.

गेल्या ६४ वर्षांपासून महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी कायदेशीररीत्या आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात बेजबाबदार, बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील यांना मी सांगू इच्छितो “कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसं, याचे उदाहरण घालून देऊ,”
अशा आशयाची फेसबुक पोस्ट धैर्यशील माने यांनी शेअर केली आहे.

गेल्या 64 वर्षांपासून महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी कायदेशीररीत्या आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात…

Gepostet von Dhairyasheel Mane am Donnerstag, 26. Dezember 2019

तसंच आजवर महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलेले आहे. भीमाशंकर पाटील यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी तसं सांगावं, आजही महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी निधड्या छातीने गोळ्या झेलायला लाखो उभे राहतील. पण कर्नाटकातील वंचितांना महाराष्ट्रात आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत हे ध्यानात ठेवावे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

*काय म्हणाले होते भीमाशंकर पाटील?

महाराष्ट्र – कर्नाटकचा सीमाप्रश्न गेल्या ६० वर्षांपासून भिजत पडला आहे. इथल्या मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटच्या सार्वजनिक मालमत्तेची हानी केली. यावर कायमस्वरुपी तोडगा काढायचा असेल तर अगोदर मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकिकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर उभं करून गोळ्या घालून विषय संपवा, असं वादग्रस्त वक्तव्य भीमाशंकर पाटील यांनी केलं होतं.

निधड्या छातीने गोळ्या झेलायला आजही लाखो उभे, महाराष्ट्र एकीकरणासाठी :- खा.धैर्यशील माने

निधड्या छातीने गोळ्या झेलायला आजही लाखो उभे, महाराष्ट्र एकीकरणासाठी :- खा.धैर्यशील माने

Gepostet von PCBToday.in am Freitag, 27. Dezember 2019