…तोपर्यंत बीडमध्ये फेटा बांधणार नाही; खासदार अमोल कोल्हेंचा निर्धार  

0
448

बीड, दि. २५ (पीसीबी) – बीडमधील परळी आणि केजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार जोपर्यंत निवडून येत नाही, तोपर्यंत बीड जिल्ह्यात आल्यावर फेटा बांधणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादीचे खासदार  अमोल कोल्हे यांनी केला आहे.

शिवस्वराज्य यात्रा  परळीहून अंबाजोगाईमध्ये  दाखल झाली.  त्यावेळी  खासदार कोल्हे बोलत होते.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या  माध्यमातून  राज्यभर  दौरा  करत आहेत. शिवस्वराज्य यात्रा  अंबाजोगाईमध्ये आली, त्यावेळी नमिता मुंदडा यांनी अमोल कोल्हे यांना फेटा बांधायला घेतला. मात्र अमोल कोल्हे यांनी फेटा बांधण्यास नकार दिला.

यावेळी कोल्हे बोलताना म्हणाले की, केज विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या आमदार नमिता मुंदडा आणि परळी विधानसभा मतदारसंघातून  आमदार धनंजय मुंडे होणार नाहीत, तोपर्यंत बीडमध्ये फेटा घालणार नाही, असा  निर्धार कोल्हे यांनी बोलून दाखवला.

दरम्यान, केज विधानसभा मतदारसंघ आणि परळी मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार आहेत. परळीमधून महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे सध्या आमदार आहेत, तर केजमधून संगीता ठोंबरे आमदार आहेत.