…तोपर्यंत आमदारांचे राजीनामे स्वीकारता येणार नाहीत – हरीभाऊ बागडे  

0
925

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत राज्यातील ६ आमदारांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र, हिवाळी अधिवेशनापर्यंत राजीनामा स्वीकारता येणार नाही, असे हरिभाऊ बागडे यांनी म्हटले आहे.

आमदारांनी राजीनामा दिला असला, तरी हिवाळी अधिवेशनापर्यंत त्यांची आमदारकी कायम राहणार आहे. विधीमंडळ नियमांनुसार राजीनामा दिलेल्या सदस्यांचे राजीनामा सभागृहात वाचून दाखवले जातात. त्यानंतर राजीनाम्या मागची कारणे विषद करुन ते स्वीकारले किंवा फेटाळले जातात, असे बागडे यांनी सांगितले.

त्याचबरोबर राजीनामा स्वीकारल्यास रिक्त झालेल्या जागांची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते.  त्यामुळे १९ नोव्हेंबरला हिवाळी अधिवेशनापर्यंत आमदारांचे राजीनामे स्वीकारले जाऊ शकत नाहीत, असे  बागडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजीनामा दिलेल्या आमदारांचे विधानसभा सदस्यपद हिवाळी अधिवेशनापर्यंत कायम राहणार आहे.