ते रात्री घराबाहेर थांबले असता काही कळायच्या आतच जे झालं ते अचंबित करणार होत….

0
209

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – घरासमोर थांबलेल्या तरुणाचा रिक्षातून आलेल्या तीन चोरट्यांनी मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना 19 मार्च रोजी यमुनानगर निगडी येथे घडली असून याबाबत 11 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्य अजित पोटफोडे (वय 25, रा. गायत्री अपार्टमेंट, यमुनानगर, निगडी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोटफोडे 19 मार्च रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास त्यांच्या घरा समोरील रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी रिक्षातून तीन अनोळखी चोरटे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या हातातील आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर चोरटे पळून गेले. याबाबत सुमारे दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.