“ते मला जर अटक करायला आले, तर सध्या घरी माझा मूड असाच आहे”; कंगनाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

0
392

मुंबई, दि.२४ (पीसीबी) : बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिवाय ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देखील सतत चर्चेत असते. तसेच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत कंगना चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने कृषीविषयक कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर कंगनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तुलना खलिस्तानी चळवळीशी केली. त्यानंतर कंगना विरोधात अनेक ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता आजही तिच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर कंगनाने सोशल मीडियावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून एक एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत कंगनाने वाइनच्या ग्लास हातात घेतल्याचे दिसत आहे. काळ्या रंगाचा स्लिट स्कर्ट कंगनाने परिधान केलं आहे. हा फोटो शेअर करत “आणखी एक दिवस, आणखी एक एफआयआर..जर ते मला अटक करायला आले… तर सध्या घरी माझा मूड असाच आहे,” असे कॅप्शन कंगनाने त्या फोटोला दिले आहे. दरम्यान, आपल्या कंगनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीत म्हटलं आहे कि, “खलिस्तानी दहशतवादी आज शस्त्रास्त्रांच्या बळावर सरकारला प्रभावित करत असतील, पण एका महिलेला विसरायला नको. देशाच्या एकमेवर महिला पंतप्रधानाने त्यांना आपल्या चप्पलेखाली चिरडलं होतं. अशावेळी त्यांच्यामुळे या देशाला किती सहन करावं लागलं ते महत्त्वाचं नाही. इंदिरा गांधींनी स्वतःच्या जीवाची किंमत देऊन यांना डासांप्रमाणे चिरडलं. त्यांनी देशाचे तुकडे होऊ दिले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक दशकं झाली तरी त्यांच्या नावाने हे थरथर कापतात. त्यांना असाच गुरू पाहिजे.”

कंगनाच्या विरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार इन्स्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आली आहे. या समितीने दिलेल्या माहितीनुसार, कंगनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार ही मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील सायबर सेलमध्ये करण्यात आली आहे. या शीख समुदायाच्या मते, कंगनाने जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन असल्याचे वर्णन केले आहे. तसेच तिने शीख समुदायविरोधात वक्तव्य करतेवेळी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर केला आहे, असे शीख समुदायाचे म्हणणं आहे.