ते मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले आणि तेव्ह्ढ्यात जे झालं ते अंगावर शहारा आणणारं होत…

0
242

पिंपरी, दि.०५ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला राॅड, बांबू आणि फरशीने बेदम मारहाण केल्याबाबत सोमवारी (दि. 3) तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या परस्पर विरोधात मंगळवारी (दि. 4) दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी झुलेलाल मंदिरासमोर पिंपरी येथे घडली.

नवीन मुकेश बेद (रा. सुभाषनगर, पिंपरी) यांनी सुरुवातीला पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रवी बेहनवाल (वय 30), दिनेश बेहनवाल (वय 19), धनवंत बेहनवाल (वय 33, सर्व रा. सुभाषनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नवीन बेद यांच्या फिर्यादीनुसार, फिर्यादी नवीन सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास पिंपरी येथील झुलेलाल मंदिरात दर्शनासाठी गेले होते. ते दर्शन घेऊन मंदिराबाहेरील रस्त्यावर आले असता आरोपींनी त्यांना अडवले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी रवी याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच आरोपी दिनेश आणि धनवंत या दोघांनी हाताने, लोखंडी रॉडने, बांबूने आणि फरशीने मारून जखमी केले.

याच्या परस्पर विरोधात रवी सोमनाथ बेहनवाल (वय 40, रा. झुलेलाल मंदिराजवळ, पिंपरी) यांनी मंगळवारी फिर्याद दिली. त्यानुसार नवीन बेद आणि चेतन बेद या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी बेहनवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 1 मे रोजी फिर्यादी त्यांच्या पत्नीसोबत दवाखान्यात पायी चालत जात होते. झुलेलाल मंदिराच्या समोर आले असता आरोपींनी त्यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून हाताने व लाकडी दंडक्याने पायावर व पाठीवर मारले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.