ते पत्र हा निव्वळ खोडसाळपणा – नितिन लोखंडे

0
499

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – कोणीतरी माझ्या नावाचा गैरवापर करून मुद्दाम खोडसाळपणे माझी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार व पोलीस दलाची बदनामी व्हावी या उद्देशाने माझी खोटी स्वाक्षरी करून एक पत्र सोशल मीडियावर टाकले असे स्पष्टीकर खंडणी व दरोडा विरोधी पथकाचे पोलीस नितिन बाळासाहाबे लोखंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविले आहे. संबंधित व्यक्तीवर तत्काळ कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या पत्राची प्रत लोखंडे यांनी प्रसिध्दीला दिली आहे. त्या म्हटले आहे की, वरिष्ठ पोलिस निरिक्षक अस्पत साहेब यांच्या विरोधात मुख्यमंत्री कार्यालयात तसेच पलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी व पोलिस स्टेशन यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे. ही तक्रार सोशल मीडियावर प्रसारातील केली आहे. हा तक्रार अर्ज आणि त्यावरील स्वाक्षरी माझी नाही. कोणीतरी इसमाने माझ्या नावाचा खोटा वापर केली आणि माझी खोटी स्वाक्षरी सदर अर्जावर केलेली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत साहेब अथवा अर्जात नमूद केलेल्या कोणाबद्दलही माझी कोणतिही तक्रार नाही. यातील सर्व मजकूर खोटा आहे. माझ्याबाबत वरिष्ठांचा गैरसमज होऊन त्यांचे समोर माझी प्रतिमा मलिन व्हावी तसेच मी कार्यरत असलेल्या ठिकाणाहून माझी इतरत्र बदली व्हावी, मला मानसिक त्रास व्हावा या हेतुने सदरची तक्रार सोशल मीडियावर टाकली आहे, असे लोखंडे यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.