तेलंगणामध्ये काँग्रेस, टीडीपी आणि टीआरएसमध्ये काँटे की टक्कर  

0
447

हैदराबाद, दि. ११ (पीसीबी) – तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (मंगळवार) सकाळी  सुरुवात झाली. सुरुवातीचे कल पाहता येथे काँग्रेस, टीडीपी आणि टीआरएसमध्ये चुरस असल्याचे चित्र दिसून येत आहे. तेलंगणा विधानसभेच्या एकूण ११९ जागांसाठी मतदान झाले होते. त्यासाठी २,८०,७४,७२२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.  ७ डिसेंबर रोजी इथे मतदान झाले होते. दरम्यान, येथे सध्या काँग्रेस, टीडीपी आणि टीआरएसमध्ये मोठी टक्कर सुरु  आहे.  दोन्ही पक्ष ३५-३५ जागांवर आघाडीवर आहेत.