तेलंगणात अकबरुद्दीन ओवेसी सलग पाचव्यांदा विजयी

0
1824

हैदराबाद, दि. ११ (पीसीबी) – तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी विजयी झाले आहेत. चंद्रयान गुट्टा मतदारसंघातून ओवेसी यांनी सलग पाचव्यांदा आमदारकी मिळवली आहे. अकबरुद्दीन हे एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे धाकटे बंधू आहेत.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ओवेसींनी ही जागा ५९ हजार २७४ च्या मताधिक्याने जिंकली होती. यापूर्वी चार वेळा (१९९९, २००४, २००९ आणि २०१४) अकबरुद्दीन ओवेसी या मतदारसंघातून विजयी झाले होते. ओवेसी बंधू प्रक्षोभक भाषणांमुळे चर्चेत असतात.

तेलंगणात एमआयएमचे उमेदवार अनेक जागांवर आघाडीवर आहेत. मात्र संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर तेलंगणा विधानसभेचे चित्र स्पष्ट होईल. तेलंगणामध्ये टीआरएसने आघाडी घेतली असून काँग्रेस-टीडीपी आघाडीही चमक दाखवत आहे. मात्र, भाजपचा तेलंगणात सुपडासाफ झाल्याचे चित्र आहे.