तृप्ती देसाई इंदुरीकरांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आज नगरमध्ये!

0
430

पुणे,दि.१८(पीसीबी) – प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर वारंवार आपल्या कीर्तनातून महिलांचा अपमान करत असतात. त्यांनी सांगितलेल्या फॉर्म्युल्यामुळे त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कलमानुसार गुन्हा दाखल झालाच पाहिजे. ते नेहमी आपल्या कीर्तनातून महिलांना दुय्यम स्थान देतात यासंदर्भातही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आज अहमदनगरमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी जाणार आहेत.

इंदुरीकर महाराजाच्या समर्थनार्थ आज नगरमध्ये मोर्चा काढण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. इंदुरीकरांविरोधात गुन्हा दाखल झाला तर मोर्चा काढू असा इशारा इंदुरीकरांच्या समर्थकांनी दिला आहे.

दरम्यान, आमच्या या मागण्यासाठी जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हाला १८ तारखेला अहमदनगरला यावं लागेल. असं सांगितलं होते. त्यामुळे माझ्या शिष्टमंडळासह नगरच्या एसपींकडे इंदुरीकरांवर तातडीने गुन्हा दाखल करा या मागणीसाठी जात आहोत, असं तृप्ती देसाईंनी सांगितलं आहे.